जानेवारीत तीन लाख प्रवाशांनी चीनमधून अमेरिकेत प्रवेश केला आणि कोविड महामारीची बीजं अमेरिकाभर रुजली.
कोविडशी मुकाबला करण्यासाठी आपल्यासारख्या सामान्य नागरिकाच्या हातात एकमेव शस्त्र आहे. ते म्हणजे आपल्या राजकीय मतांचे, धार्मिक भावनांचे चष्मे उतरवून ठेवून कुठलाही पवित्रा न घेता वस्तुनिष्ठपणे या घटनेकडे आणि तिच्या परिणामांकडे पाहणे. हे पुस्तक लिहितानाही मी तेच शस्त्र वापरायचं ठरवलं. बा. सी. मर्ढेकरांच्या ‘भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्याची कसोटी’ या ओळी हा अशा सगळ्या घटनांकडे पाहण्याचा माझा मंत्र आहे.......