आदिवासी, नक्षलपीडित भागात जिवंत असलेल्या माणसांबाबत सरकार व खुद्द डॉक्टरांमध्ये संवेदनहीनता कशी काय येऊ शकते?
केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी २५ डिसेंबर २०१७ रोजी चंद्रपूरमध्ये जेनरीक औषधांच्या दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सकाच्या अनुपस्थितीवर टीका करताना ‘आम्ही येत असताना सुट्टी घेणं म्हणजे तुम्हाला लोकशाही मान्य नाही. तुम्ही लोकशाही मानत नसाल तर नक्षल्यांप्रमाणे जंगलात जा. आम्ही तुम्हाला गोळ्या झाडू. तुम्ही कशाला गोळ्या देता लोकांना?’ असं सवंग भाषण ठोकलं होतं.......