‘स्पायरल ऑफ सायलन्स’ : सामाजिक मतप्रवाह कुठल्या दिशेने चालला आहे, यावर तुम्ही आपली राजकीय, सामाजिक मते व्यक्त करायची की, शांत पडून राहायचं ठरवता, हे सांगणारं तत्त्व
एलिझाबेथला असे आढळून आले की, एखाद्या समूहात आपल्या मतांना इतरांकडून पुष्टी मिळते आहे, असे दिसून आले, तरच माणसे आपले मत प्रकट करतात, अन्यथा समूहातील बहुसंख्यांना आपली मते पटत नाहीत असे त्यांना वाटले, तर ते गप्प बसतात. समाजात मतांचा हा भोवरा सतत गरगरत असतो, त्याच्या डोक्याकडे सर्वाधिक समान धारणांचे वर्तुळ. जसे खाली जाल, तसे आसावर गरगर स्थिरावल्यासारखी दिसते, ती स्थिरता गप्प बसलेल्या अल्पमतांची. या भोवऱ्याला गती देतो,.......