अझानच्या भोग्यांचा वाद : सौदी अरेबियात वाहू लागलेले बदलाचे वारे आता ‘भारतीय इस्लाम’लाही कवेत घेऊ लागले आहे...
भोंग्यावरून अझान देण्यावरून मुस्लीम समाज कायमच विभागलेला होता. साठीच्या आणि सत्तरीच्या दशकांमध्ये बऱ्यापैकी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनुयायी मिळवणाऱ्या ‘तब्लीग जमात’च्या समर्थकांचा लाऊडस्पीकर-वरून आझान देण्याला विरोध होता. कारण आझान देण्यासाठी एखाद्या उंच ठिकाणी चढून प्रार्थनेसाठी लोकांना साद घालावी, याला प्रेषितांनी प्राधान्य दिल्याचे या संघटनेने निदर्शनास आणून दिले होते.......