‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

‘विलोभ’ : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे समर्थक आणि राजधानी दिल्लीत महाराष्ट्र-संस्कृतीचे ‘अस्सल राजदूत’ म्हणून कार्यरत असलेल्या कवींच्या कवितांचा प्रातिनिधिक संग्रह

दिल्लीतील १८ मराठी भाषिक कवींच्या मुख्यत: मराठी व काही हिंदी कवितांचे हे संकलन रसिकांच्या हाती देताना आम्हा सर्वांना आनंद होत आहे. ही सर्व मंडळी गेली काही दशके महाराष्ट्राबाहेर तर आहेच पण जवळजवळ सगळीच तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, दूरसंचार अशा कवितेपासून दूर असणाऱ्या क्षेत्रांत आपापला ठसा उमटवलेली मंडळी आहेत. केवळ मातृभाषा आणि महाराष्ट्र हीच प्रेरणा, हाच दुवा आणि हाच ध्यास घेतलेली ही मंडळी आहेत.......