‘द वाईफ’ : अप्रतिम दिग्दर्शनातून आणि सशक्त अभिनयातून क्लासिक्सच्या पंक्तीत पोहोचला सिनेमा
जोसेफला नोबेल मिळाल्यानंतर त्या रात्री अचानकपणे ज्योच्या चेहऱ्यावरील चित्रपटाच्या सुरुवातीपासून धारण केलेल्या थिजलेल्या थंड रहस्यमयी स्मिहास्याचा अर्थ उमगायला लागतो. कथेला नाट्यमय वळण मिळतं. ज्योच्या भावनांचा उद्रेक होतो. सनीसनीखेज तथ्य बाहेर येतं. मुखवटे गळून पडतात. वरवर संथ भासणारी ही कलाकृती प्रत्येक प्रसंगात मानवी जीवनाचे अनेक कंगोरे दाखवते, शेवटी अनपेक्षित वळणं घेते आणि अचानक थांबते........