एकीकडे गुरू ईश्वर; दुसरीकडे ध्वज गुरुस्थानी, तिसरीकडे समाज भगवंताचे रूप, तर मां भारती परमपूज्य आणि पवित्र. भरीस भर अजून एक ईश्वरी दूत…

अत्यंत नम्र, अत्यंत विनयशील अन् अत्यंत स्पष्टपणे आढेवेढे न घेता साहेब आपले ‘प्रेषितत्व’ प्रकट करत होते. आमची खात्री पटली की, आता आमच्या या प्रिय प्राचीन राष्ट्राचे भवितव्य ‘परमेश्वराधिन’ झाले असून, चिंता करण्याचे काहीएक कारण नाही. लोकशाही व्यवस्थेमध्ये साहेब ‘परलोकशाही’चा अनुभव देशाला देणार आहेत. या नव्या प्रेषिताला घ्याव्या लागलेल्या जाहीर सभा आणि बोलावे लागलेले कठोर शब्द वाया गेले, असे आम्हाला वाटू लागले.......

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

गोळवलकर आणि मोदी एका बाजूला अन् खुद्द सरसंघचालक दुसऱ्या बाजूला… असे कसे झाले, एवढ्या शिस्तीच्या, एकमुखाने बोलणाऱ्या संघटनेत? संघ व सरकार या दोघांत अशी विरोधी व टोकाची मते कशी काय?

ब्रिटिश जसे वागत, अगदी तसा संघाचा व्यवहार असतो. म्हणून भाजप व संघ याच ‘सर्वे सुखिना: संतु’ तत्त्वाचे अमलदार. त्यांनी ना अस्पृश्यतेवर हल्ला केला, ना निरक्षरता, अंधश्रद्धा अथवा दारिद्रय अन् विषमता यांच्यावर. सारे काही टिकवून राज्य करायला कोणाची ना असणार? झालाच काही बदल आपोआप म्हणजे लोक ‘हे नको, ते नको’ म्हणू लागले, तर आपणही ‘हो, बरोबर आहे’ असे म्हणून त्यांच्या कलाप्रमाणे वागायचे झाले!.......

मध्यमवर्ग कोण्याही देशाचे बौद्धिक, कलात्मक, वैज्ञानिक वा क्रीडाविषयक नेतृत्व करत असतो, त्याने स्वयंप्रज्ञ होणे थांबवले आहे. तो अंधभक्त व प्रचारक बनला आहे

मध्यमवर्ग नेतृत्वस्थान त्यागून पाठिराखा, अनुयायी बनू लागला आहे. ज्या माध्यमांमध्ये या मध्यमवर्गाची शंभर टक्के उपस्थिती असे, त्यातून तो गायब झालेला आहे. वैचारिक द्वंद्व तो आता टाळतो. वस्तुस्थिती त्याला भिववते. प्रतिवाद आणि दुसरी बाजू त्याची हवा काढते. खुशमस्करी, चापलुसी, स्तुती हे मध्यमवर्गाचे गुण बनले आहेत. पुनरुज्जीवन चाहणाऱ्या हिंदुत्ववादी सामाजिक-राजकीय विचारांचा मध्यमवर्ग आता ‘नवभारता’चा नेता झालेला आहे.......

या टीव्ही वाहिन्यांच्या ‘पडद्यावरती’ चाललंय काय? त्यांच्या ‘पडद्याखाली’ चाललंय काय? अगदीच सराईतासारखे काही सेकंदांचे नाट्याविष्कार घडत आहेत...

माध्यमे जर लोकशाही राज्यव्यवस्थेत एवढा थेट हस्तक्षेप करू धजतील, तर उद्याचे पक्ष, त्यांचे विचार आणि देशाचे नेते यांची जडणघडण आणि लालनपालन तीच करत राहतील. म्हणजे माध्यमांचे मालक, त्यांचे संपादकीय हस्तक आणि व्यापार-उद्योग यांमधले मित्र, यांचेच अप्रत्यक्ष राज्य देशावर चालणार असे झाले. तुम्ही विचारपूर्वक मतदान करा की करू नका, राज्यकर्ते तुमचे प्रतिनिधी न बनता या माध्यमिक राज्यसंस्थेची खेळणी बनून जातील .......