मी अद्यापही रंगमंचावर काम करत असल्यामुळे मला सुचलेले उपाय आपल्यासमोर मांडू इच्छितो.
शुक्रवारपासून उस्मानाबादमध्ये ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सुरुवात झाली. आज या संमेलनाची सांगता होईल. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केवळ मागण्या, अर्जवे आणि विनंत्या करण्यातच धन्यता मानली. नाट्यसंमेलनही साहित्यसंमेलनासारखंच ‘अर्जदारां’चं होत चालल्याचा हा उत्तम पुरावा आहे. सावरकर यांचं अध्यक्षीय भाषण..........