प्रत्येक गावाचा व शहराचा ‘पाण्याचा ताळेबंद’ तयार करून ‘पाळण्यातले पाय’ ओळखणे व क्षमतेनुसार व्यवस्थापन ही काळाची गरज आहे
पाण्यासाठी महिलांची फरफट किती वर्षे किती पिढ्या चालू द्यायची? किती वर्षे पिण्यास अयोग्य असलेले पाणी बालकांनी प्यायचे? किती वर्ष दूषित पाण्यामुळे बालकांच्या, महिलांच्या आणि वयस्कांच्या आरोग्याशी तडजोड करायची? किती वर्षे नागरिकांनी पाण्यासाठी खस्ता खायच्या? किती वर्ष शुद्धीकरण केलेले पाणी गाड्या धुण्यासाठी वापरायचे? याला कधी तरी आपण गांभीर्याने पाहणार आहोत की नाही?.......