आज भारत ‘पाकिस्तान’चे अनुकरण करू पाहत आहे. बहुसंख्याकवादी लोक एककल्ली अरेरावीने आपले विचार सर्वांवर लादू पाहत आहेत
भारत हा हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख या जगातील चार महत्त्वाच्या धर्मांचा प्रवर्तक आहे. याशिवाय पारशी, यहुदी, मुसलमान व ख्रिस्ती अनुयायी येथे कित्येक शतकांपासून राहत आले आहेत. ‘भारत’ या विचाराला आतापर्यंत यापैकी कोणापासूनही कधी ‘खतरा’ निर्माण झाला नाही. त्याचे कारण भारताचा आपल्या विविधतेवर असलेला गाढ विश्वास! हा देश कधी धर्मापासून होणारी बाधा किंवा संकुचित दृष्टीकोनाच्या भानगडीत पडला नाही.......