‘माय मरो, मावशी जगो’ या म्हणीच्या अर्थाला सामोरं जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही!
तिनं चौकटी मोडून काढल्या आणि त्यासाठी भरपूर सोसलं. तिचं वयानं आणि कर्तृत्वानं मोठं होणं मी अभिमानानं मिरवलं. वयानं माझ्याहून लहान असूनही माझं क्षितिज तिनं विस्तारलं. तिचे अनेक प्रकल्प अर्धवट राहिले आणि तिच्या हातून आणखीही भरीव काम होणार होतं, ते राहून गेलं, याची खूप खंत वाटते. मात्र तिचे शब्द आणि त्यातून झालेलं परिवर्तन मृत्युही हिरावून घेऊ शकत नाही. तिनं आकाश कवेत घेतलं आणि पराभवाची तमा बाळगली नाही.......