प्रशान्त, तुझ्या लेखनातले धागेदोरे ‘सिम्फनी’मय असतात. त्यात ‘डिस्टॉर्शन’चं सौंदर्य आहे. या लेखनात ‘सुरूप-कुरूप’च्या पलीकडचं काही असतं. ‘चक्रमपणा’ही असतो…
तुझ्या लेखनात चक्रमपणा आहे, परंतु तो निव्वळ चक्रमपणा म्हणून येत नाही. म्हणजे पर्वती पायांवर चालून चढता येते, तर मी ती हातांवर चालून चढून दाखवतो, अशा तर्हेचा तो चक्रमपणा नाही. त्या चक्रमपणाला स्वतःची चक्रम शिस्त आहे. मला असं वाटतं की, त्याचं मूळ तुझ्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात आहे. तू जे तत्त्वज्ञान वाचलं आहेस, ते तुला पचलेलं आहे. तू अर्धा-कच्चा नाही आहेस. तुझ्या ‘डिस्टॉर्शन्स’मधून ‘ब्युटी’ दिसत राहते.......