आजच्या घडीची आपली ‘शोकांतिका’ आणि ती शोकांतिका बदलण्यासाठीची आपली ‘कुवत’…
माणूस म्हणून आपल्याला आव्हानं पेलण्यापेक्षा सोपी उत्तरं शोधणं सोयीचं वाटतं. ही सोपी उत्तरं नवस-सायास, अंगारे-धुपारे, पुजारी-बडवे, अगदी राजकीय नेत्यांच्या स्वरूपातही येतात. माणूस म्हणून आपलं दुर्दैव हे की, आपल्यातल्याच कितीतरी संतांनी आपल्याला जागं करायला आयुष्य वेचली, तरी आज एकविसाव्या शतकातसुद्धा देवाचं दर्शन घेण्यासाठी देवळात प्रवेश मिळावा की न मिळावा, या अधिकारावरून आम्ही स्वतः:ची व एकमेकांची डोकी फोडतो.......