ठाकूरांचं ते चित्र चावलं म्हणजे चांगला दंशच झाला म्हणा ना! दंश म्हणा, डंख म्हणा - काहीही म्हणा!! पण चावा होता मोठा जीवघेणा...
रेषेला दर्जा असतो, हे जाणवण्याचं ते वय होतं, पण ते म्हणजे नक्की काय, आणि का, हे समजण्याचं नव्हतं. मात्र ह्या जमावाच्या चित्रानंच तर आमचा एकूणच अभ्यास कुठं कमी पडतोय, हे क्षणार्धात लक्षात आणून दिलं. शेपट्या उंचावलेल्या, शेपटी हलवणाऱ्या कुत्र्यांच्या झुंडीचं हे चित्र आहे, एकेकट्या कुत्र्याचं नाही, हे लक्षात आल्यानं आपल्याला होत असलेला हा दंश कशाकशाचा आहे, हेही हळूहळू लक्षात येऊ लागलं.......