इतक्या आघाडीच्या कवीचा सुमारे ४१ वर्षे संग्रह निघू नये आणि त्याविषयी कुणाला साधी खंतही वाटू नये, हे आपल्या साहित्यिक-संस्कृतीच्या हलकेपणाचंच लक्षण आहे
‘कोलाहल’मध्ये सुमारे ११६ कविता आहेत. एखाद्या कवीच्या एकूण काव्यगत व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्यासाठी नियतकालिकांतून आलेल्या कविता फारशा उपयुक्त नसतात; त्या सर्व कविता एकत्र संकलित होऊन समोर येणं आवश्यक असतं. आता या संग्रहामुळे गुर्जर यांच्या एकूण कवितेचं पुनर्मूल्यांकन होऊन त्यांचं मराठी काव्यपरंपरेतलं स्थान निश्चित करता येईल.......