भाऊ (जांबुवंतराव धोटे) विदर्भाचे सिंह होते, शेवटपर्यंत सिंहासारखंच जगले!
भाऊंचा प्रचार बिन पैशाचा असायचा. साधा चुना आणि काव मिळाला की, भिंती रंगवायच्या. तेही नसेल तर साध्या कोळशाने भिंतीवर लिहिलं जायचं. विदर्भाचं भलं व्हावं, लोकांना न्याय मिळावा, असं भाऊ आयुष्यभर तळमळीने सांगत राहिले, त्यासाठी लढत राहिले. आजच्या काळात गरिबांच्या मनात जागा मिळवणं सोपं नाही. त्याला फार मेहनत, स्वच्छ मन आणि चारित्र्य लागतं. ‘भागो मत, दुनिया बदलो’ असं भाऊ ठामपणे सांगत. भाऊ विदर्भाचे सिंह होते........