जेव्हा मुले एक जबाबदार नागरिक बनण्यासाठी लहानपणापासून मोठ्यांच्या मदतीने लोकशाहीचा प्रत्यक्षानुभव घेत-घेत स्वतःचा विकास साधतात, तेव्हा त्यांचा लोकशाहीवरचा विश्वास दृढ होत जातो
सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण हे लोकशाही शिक्षणाचे महत्त्वाचे अंग असते. चांगल्या शिक्षणातून सुजाण नागरिकत्व तयार होऊ शकते. सुदृढ समाजाच्या बांधणीसाठी हे बाळकडू मुलांना मिळणे अपरिहार्य ठरते. त्यामुळे शिक्षणात आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये लोकशाहीची मूल्ये, प्रथा आणि संकेत रुजवणे आणि दर्जेदार शिक्षण देणे, हे लोकशाहीवर अढळ विश्वास असणाऱ्यांचे कर्तव्य बनते. सर्व संबंधित यावर विचारमंथन करून काम सुरू करतील, अशी आशा आहे.......