जयंत पवार हा समकालीन मराठी साहित्यातला ‘अनन्यसाधारण’ आणि ‘जागल्या लेखक’ होता...
जयंतच्या कथांच्या दुनियेत अद्भुत, कल्पित, फॅन्टसी, इतिहास, असंगतता, गूढ, अतार्किकता आणि मिथकं येतात. त्यानं या मिथकांना डोक्यावर उभं केलं, ती उलटीपालटी केली, नवी मिथकं रचली. ते करताना आशयाला नेमकी अनुरूप भाषा वापरली. एक लेखक भाषेचा किती खोलवर विचार करून वैविध्यपूर्ण वापर करू शकतो, याची उदाहरणं जयंतच्या लेखनात आपल्याला सर्वत्र सापडतील.......