कॉ. शरद् पाटील कोणत्याही एका अंगानं समजून घेता येत नाहीत. ते अनेक अंगांनी समजून घ्यावे लागतात.
प्राच्यविद्या संशोधक, ‘माफुआ’कार, ‘सौत्रांतीक मार्क्सवाद’कार कॉम्रेड शरद् पाटील यांचा आज पाचवा स्मृतिदिन. शपांनी पाच हजार वर्षांचा भारतीय संस्कृतीचा, तिच्यातील संघर्ष-समन्वयाचा आढावा घेताना पुराणकथांतील वास्तवतेचा अचूक वेध घेणारी अद्ययावत अन्वेशन पद्धत विकसित केली. त्याद्वारे प्राचीन भारताचा, बुद्ध कालखंडाचा, मध्ययुगीन इतिहासाचा वेध घेत नवी दिशा दिली.......