‘Social Distancing’ नका म्हणू, त्याचा भारतीय इतिहास भयकारी आहे
पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य म्हणजे दलित समाजाने दोन हजार वर्षे हा अपमान भोगला आणि त्याची मोठी किंमत या देशाला चुकवावी लागली. ही अस्पृश्यता आता मुस्लीम समाजाच्या आणि नॉर्थ-ईस्टच्या वाट्याला येण्याचा धोका आहे. देशाची एकता आणि संविधानाने मिळालेलं आश्वासन, याला यामुळे सुरुंग लागतो आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण पुढाकार घ्यावा. द्वेष व हेटाळणीची शिकार झालेल्या देशबांधवांना आश्वस्त करावं, अशी आमची विनंती आहे.......