वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय लोकशाहीची ‘लिटमस टेस्ट’
वंचित बहुजन आघाडीची मांडणी लोकशाही मार्गानं समानता स्थापन करण्याच्या स्वप्नाला धरून आहे. याची दोन प्रमुख कारणं आहेत. एक म्हणजे सत्तेची पुनर्वाटणी आणि आजवर सत्तेपासून दूर ठेवलेल्या समाजघटकांच्या हातात सत्ता देण्याचा हा प्रयत्न आहे. दुसरं म्हणजे एका प्रादेशिक चळवळीच्या रूपाने वंचित बहुजन आघाडी उभी राहते आहे. त्यामुळे लोकशाहीत फेडरलिझम बळकट करण्याची शक्यता तिच्यामध्ये आहे.......