‘लॉकबिट’ हे नाव काही दाउद इब्राहिम किंवा छोटा राजन यासारखं सर्वांच्या कानावरून गेलं नसेल, पण संघटित सायबर गुन्हेगारी क्षेत्रातलं तसंच घातक नाव आहे
जसजसे कम्प्युटरवर आपण जास्त अवलंबून राहायला लागलो, तसतशी साहजिकच या खंडणीच्या प्रकरणांमध्येही वाढ होत गेली. १९८९मध्ये फ्लॉपी डिस्कमधून लोकांच्या कम्प्युटरमध्ये शिरून, ते अडकवून १८९ डॉलर्सची मागणी करणारा व्हायरस आता हास्यास्पद वाटू शकेल, पण त्या ‘चोरवाटे’चा आता ‘महामार्ग’ झाला आहे.......