भास्कर चंदावरकरांचे पुस्तक रोमहर्षक, उदबोधक आणि समृद्ध करणारे आहे!
भास्कर चंदावरकर हे भारतीय शास्त्रीय संगीत अभ्यासक, कलाकार, गुरू, भाष्यकार, भारतीय संगीतीचे प्रेमी. भारतीय संगीताची ‘भलती भलामण’ ते करत नाहीत. भारतीय संगीताची थोरवा गात ‘सुटत’ नाहीत. उगीचच अन्य संगीत संस्कृतीला ‘हिणवत’ नाहीत. कोणतंही अतिरंजित, अतिशयोक्त, बेजबाबदार विधान करत नाही. आपल्या संगीताविषयीचं प्रेम त्यांच्या कथनाच्या तळाशी मात्र मंद गुंजन करत असल्याचं जाणवतं.......