भारतीय मुसलमान
काही लोक असे मानतात, की गांधीजींचा मार्ग चुकीचा होता. त्या मार्गाने जाऊन ही समस्या सुटण्याची शक्याता तेव्हाही नव्हती व आताही नाही. म्हणून त्या मार्गाच्या श्रेष्ठत्वाचा स्वीकार करता येत नाही आणि गांधीजींचे अपयश उज्ज्वलही ठरत नाही. सावरकर वगैरे मंडळी ज्या मार्गाचा पुरस्कार करीत होती, तोच मार्ग त्यावेळीही योग्य होता आणि यापुढेही त्याच मार्गाने हा प्रश्न सुटेल. माझे स्वत:चे मत या दोन मतांहून थोडे वेगळे आहे.......