हा ग्रंथ केवळ नेहरू कुटुंबाचा इतिहास, त्यांचा वारसा, त्यांचा विचार, यांपुरता मर्यादित नाही. हा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांचा झपाटलेला आढावा आहे
पंडित नेहरू हयात असताना, लोकप्रियतेच्या शिखरावर असताना, जगभर त्यांची प्रचंड प्रतिष्ठा असतानाही, ‘नेहरूंनंतर कोण?’ या प्रश्नाची उघड चर्चा होत असे. वेक्स हॅन्गेन या तत्कालीन ख्यातनाम अमेरिकन पत्रकाराने १९६० ते १९६३ या काळात, भारतीय राजकारणाचा सखोल अभ्यास केला. अशा अनेक नामवंत नेत्यांच्या तसेच मुत्सद्द्यांच्या, पत्रकारांच्या आणि अभ्यासकांच्या मुलाखती घेतल्या. नेहरू हयात असतानाच त्यांनी एक ग्रंथ लिहिला - ‘After Nehru, Who?.......