तिच्यासाठी मी काय आहे, हे मला अजूनही नीटसं उमगलेलं नाही. मात्र माझ्यासाठी ती ‘सर्वस्व’ आहे!
घरात लेक असणं, ही भावनाच मुळात काव्यमय आहे. तिच्या निरागस भावविश्वात चाललेल्या अनेक अतर्क्य गोष्टी अनुभवताना आपण समृद्ध होत जातो. एकूणच ‘बेनझीरचं असणं’ हे आमच्या कुटुंबासाठी वरदान ठरलं आहे. सातत्यानं हसत-खेळत-बागडत राहणारा हा इवलासा जीव आयुष्य सुगंधित करतो आहे. रोज घरात पाऊल टाकताना ‘ती काय करत असेल?’ अशी कल्पना सर्वांत आधी मनात येते. तिचा स्पर्श ही जगातली सर्वांत सुंदर गोष्ट आहे.......