गोंधळलेल्या परिस्थितीमुळे मुलं, पालक भांबावून गेले आहेत. आणि शिक्षकदेखील.
पालकांच्या म्हणजेच समाजाच्या आर्थिक स्तराचा विचार केल्यास ऑनलाइनच्या खटपटीत शिक्षणापासून मध्यमवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारा वर्ग काहीसा दूरच राहत आहे. शिक्षण विभाग मात्र शैक्षणिक वर्ष चालू असल्याचे दाखवून पुढे चालत आहे. अगदी अलीकडेच शिक्षण विभागाकडून पाठ्यक्रमातील काही भाग वगळले असल्याचे परिपत्रक आले आहे. वगळलेला भागातील महत्त्वाचा भाग विद्यार्थ्यांकडून कसा पूर्ण करून घ्यावा?.......