सॅम हॅरिस- माजिद नवाझ यांच्या चर्चेत मुख्यत्वे इस्लाम व ख्रिश्चन धर्मांचे संदर्भ येतात, पण त्यांच्या चर्चेमागची भावना सर्वच धर्मियांना उपयुक्त ठरावी
मानवाने आदिमतेपासून सुरू केलेला आणि आधुनिकतेच्या दिशेने जाणारा प्रवास अधिक सुकर, सुखकारक आणि सौहार्दपूर्ण व्हावा असे वाटत असेल, तर भिन्न धर्मियांमध्ये निकोप चर्चा आवश्यक आहे. अशी चर्चा शक्य आहे, हे या पुस्तकातून फार प्रभावीपणे समोर येते. भारतात अशा चर्चांची विशेष आवश्यकता आहे. कारण आपण स्वत:ला धर्मनिरपेक्ष, लोकशाही राष्ट्र मानतो आणि विविधतेत एकता हे स्वत:चे वैशिष्ट्य समजतो.......