ब्रिटिशांना बीबीसीचा आणि अमेरिकेला सीएनएनचा अभिमान वाटतो, तसा अभिमान वाटण्याजोगी वृत्तवाहिनी भारतापाशी आहे?
एके काळी ‘आम्ही सरकारची गैरकृत्यं चव्हाट्यावर आणतो,’ अशा बढाया मारणारी वृत्तपत्रं व वृत्तवाहिन्या आज तसं करायला कचरू लागली आहेत. त्याहूनही वाईट म्हणजे सरकारच्या विरोधकांच्या आणि टीकाकारांच्या विरोधात बोलताना मात्र आमचे आवाज चढतात. म्हणजे सत्तेतील लोकांवर ‘वॉचडॉग’ बनून गुरकावण्याऐवजी आजचा मीडिया राखणदार कुत्र्यासारखा किंवा मालकाला आपण आवडावं अशी इच्छा धरणाऱ्या पाळीव कुत्र्यासारखा वागू लागला आहे.......