खरं सांगण्यापूर्वीचं ‘स्वगत’
मी जी निर्मिती करतो, त्याच्या फळाची मी फार पर्वा करत नाही. पूर्वी मी यशाला फार महत्त्व द्यायचो. आता वाटतं, एखादा सिनेमा पडला तर पडला. पुढचा चालेल. जर सिनेमा हिट झाला, तर छानच! पुढच्या कामाला सुरुवात करा. आता एका अर्थानं यश आणि अपयश या बाबतीत माझ्या भावना बधिर झाल्या आहेत, असं म्हणता येईल.......