दिवसा रझाकार यायचे, रात्री ‘ते’ यायचे : तेलंगणातील स्त्रियांच्या आठवणीतली ‘पोलीस ॲक्शन’
हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी ‘ऑपरेशन पोलो’ उर्फ ‘पोलीस ॲक्शन’ केली गेली. त्याला ‘हैद्राबाद मुक्ती’ असंही संबोधलं जातं. पण ‘हैद्राबाद मुक्ती’ या अर्थाखेरीज इतर काही अर्थ त्या ॲक्शनशी निगडीत आहेत का, हे तपासण्याची संधी समोर आली. आणि मला १९९७-१९९८ साली तेलंगणातल्या वृद्ध स्त्रियांच्या मुलाखती आठवल्या. त्यांचे विविधांगी अनुभव तपासले, तर त्यांतून काही निराळं हाती आलं.......