कोविड-१९ महामारीनंतर विज्ञानलेखनात काय काय धरायचं?
कोविड-१९च्या साथीने दाखवून दिलं की, विज्ञान हे लोकांपेक्षा वेगळं असू शकत नाही आणि लोक विज्ञानापेक्षा वेगळे असत नाहीत. प्रत्येक गोष्टीला विज्ञानाचा स्पर्श आहे, विज्ञानाला प्रत्येक गोष्टीचा स्पर्श आहे. मग विज्ञानात काय काय येतं? चौकट कुठे कशी आखणार? ती गळूनच पडली. विज्ञान हा काही हस्तिदंती मनोरा नाही, त्याचे महत्त्व विषद करून सांगावं असं ते परकं नाही.......