गजानन भास्कर मेहेंदळे यांना एका इतिहास अभ्यासकाचे अनावृत पत्र
ज्यांचे मेंदू द्वेषानं आणि हात रक्तानं बरबटले आहेत, अशा कोणत्याही जाती-धर्माच्या लोकांची आपण कशाला चिंता करावी? पण निष्पापांचं काय? कोणत्याच प्रकारच्या द्वेषाच्या राजकारणात इतिहास अभ्यासक म्हणून मी भागीदारी करू इच्छित नाही, मग ते ब्राम्हणद्वेषाचं असो, मराठाद्वेषाचं असो, दलित द्वेषाचं असो किंवा मुसलमान द्वेषाचं असो. तमाम महाराष्ट्रीय जनतेच्या मानगुटीवर बसलेल्या इतिहासरूपी समंधाचं नेमकं काय करायचं?.......