महाराष्ट्राचा इतिहास जवळपास चारेक हजार वर्षांचा आहे!
ह्युआन श्वांग हा प्रवासी भारतात असताना जेव्हा महाराष्ट्रात आला, तेव्हा त्याने त्याच्या लेखनात ‘ही भूमी दंडकारण्य नावे ओळखली जात असे’ असा उल्लेख केला आहे. त्याच्या प्रवासवर्णनात महाराष्ट्राबद्दल केलेल्या नोंदीत त्याने महाराष्ट्राचा उल्लेख ‘महोलचे’ असा केलाय. तो म्हणतो, ‘‘इथली जमीन अतिशय सुपीक आहे. लोक सधन आहेत, पण लोकांची राहणी अतिशय साधी आहे. स्वाभावाने हे लोक अतिशय तापट असले तरी नाहक आक्रमक नाहीत...”.......