भारतातल्या मुसलमानांचा नेता कोण असायला हवा?
मुसलमानांचा पाठिंबा हवा असेल तर त्याची गुणवत्ता काय असली पाहिजे? त्यांचं मुसलमान असणं किंवा मुसलमानांचा आवाज असणं? हा प्रश्न मी यासाठी विचारतो आहे की, गेल्या पाच वर्षांत या दोन्ही मुस्लीम (कन्हैय्या व प्रकाश राजविरोधात उभे असलेले मुस्लीम उमेदवार) उमेदवारांनी मुस्लिमांविरोधात सुरू असलेले अत्याचार, शत्रुकरण आणि बहुसंख्याकवाद यांच्या विरोधात कधी जाहीर व ठोस भूमिका घेतली आहे का?.......