दुधाची तिसरी वाटी ठेवायची का नाही, हे ठरवण्यापुरताच या नाटकात माझा रोल होता!
एके दिवशी सकाळी ढंप्याला दूध-पोळी द्यायला गेले तर वेगळंच दृश्य दिसलं. एक गलेलठ्ठ बोका तिथं गाणी गात होता. ढंप्याला तो काही करेल या भीतीनं त्याला मी हाकलून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी खायच्या वेळेस लांब असलेली बोकोबाची स्वारी दिसली. फरक कसा होता की, आज गाणी माझ्याकडे बघून गात होता. माझ्याकडे एकटक बघत होता. मी त्याला हाकलल्यावर ‘जातोच आहे मी... ओरडू नका...’ असा भाव चेहऱ्यावर आणून किंचितही चाल न बदलता निघून गेला.......