देशात आज काय चाललं आहे, याबाबत भिन्न मतं आहेत. तीही दोन टोकाची. कुणी म्हणतात, हा ‘अमृतकाल’ आहे, तर काहींना हा ‘जहरकाल’ वाटतोय...
मुळात प्रश्न कथानकात जे काही घडतं, ते खरंच घडतं का याचा आहे. आणि समजा घडवलं गेलं असलं, तर ते कोणत्या पद्धतीनं घडवण्यात आलं असावं, त्याला कुणाची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत-सहाय्य असावं, याचा तर्कशास्त्राच्या आधारे घेण्यात आलेला हा शोध आहे. यासाठी दैनिकं, साप्ताहिकं आणि, नियतकालिकांतील बातम्या, लेख मुलाखती यांचा आधार घेतला आहे. खास उल्लेख करायचा तो ‘गुजरात फाइल्स’ या पुस्तकाचा.......