‘मी वसंतराव’ : बेसूर होत चाललेल्या समाजात हा सिनेमा आत्मीयभावाचा आनंद शेअर करतो, ही कृती दिलासा देणारी वाटते
‘मी वसंतराव’ उभारण्याची प्रक्रिया लोभस आहे. पं वसंतरावांची चिकित्सा करून त्यांच्या सांगीतिक कार्याचे विश्लेषण करण्यापेक्षा, त्यांच्याकडे आपण जगतो त्या काळाच्या नजरेतून प्रेमाने पाहणे, हा या सिनेमाचा एक उद्देश आहे असे वाटते. ‘मी वसंतराव’ या सिनेमात नातू आणि कलाकार अशा दोन, एकमेकांला पाठबळ देणाऱ्या, भूमिकांतून राहुल जेव्हा भूमिका निभावतात, तेव्हा ते आजोबा आणि कलाकार, अशा दोन जगण्यांना सामोरे जात असतात.......