गांधींनंतरचे गांधी!
मोहनदास करमचंद गांधी (१८६९-१९४८) यांच्या मृत्यूला साठ वर्षे उलटून गेल्यानंतर चार गांधी आजही जीवित आहेत. या चौघांची ओळख प्रस्थापित करणे आवश्यक ठरते. कारण मायबाप इंग्रज सरकारने त्यांच्या जमान्यात हे काम नक्कीच नेकीने केले असते. हे चारही गांधी त्रासदायक आहेत, पण त्यांचा त्रास वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या प्रकारे होत असतो.......