नेते निवडणूक जिंकतात तेव्हा ईव्हीएम ‘चांगले’ असते आणि हरतात तेव्हा ‘वाईट’ असते!
ईव्हीएमविषयीची चर्चा, निवडणुकीच्या भविष्याप्रमाणे राजकीय पक्ष आणि व्यक्तींच्या बदलणाऱ्या भूमिका यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. यावरूनच ईव्हीएमबाबतचा संधिसाधू विरोध लक्षात येतो. भारतातील प्रत्येक राजकीय पक्षाने त्यांच्या निवडणुकीतील अपयशाचे खापर कधी ना कधी ईव्हीएमवर फोडलेले आहे. पण त्यांनी त्यांच्या विजयाचे श्रेय ईव्हीएमला कधीही दिलेले नाही.......