“सरकारनेच आम्हाला वाऱ्यावर सोडलं, तर आम्ही काय करायचं? आम्ही खरोखरच ‘भारताचे नागरिक’ आहोत का?”
मणिपूरमध्ये यादवी आणि अराजक माजलं आहे. त्यावर सरकारने वेळीच पावलं उचलायला हवीत. तसं केलं नाही, तर मणिपूरचं आणि पर्यायाने ईशान्य भारताचंच मोठं नुकसान होणार आहे, असं इतिहासकार रामचंद्र गुहा म्हणतात. त्यांच्या मते, १९८९ साली काश्मीरमध्ये आणि २००२मध्ये गुजरातमध्ये जी परिस्थिती होती, त्याहूनही भीषण परिस्थिती मणिपूरमध्ये आहे. त्याचे पडसाद आसाम, मिझोरम, नागालँडमध्येही उमटू लागले आहेत.......