रशिया, फ्रान्स आणि इंग्लंडने जर्मनीसारख्या प्रगत राष्ट्राच्या आकांक्षांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. जमेल तेवढे त्याला दाबण्याचे, एकटे पाडण्याचे राजकारण केले!
१९०५ आणि १९११मध्ये खरे तर युद्ध पेटायचे, पण जर्मनीने माघार घेतल्यामुळे ते दोन्ही वेळेस टळले. हा समजूतदारपणा नव्हता, तर आपण एकटे पडलो आहोत, हे ओळखून आणि पूर्ण तयारी केल्याशिवाय असे वेडे धाडस करायचे नाही, हे तो शिकला. युरोपात रशिया, फ्रान्स आणि इंग्लंड हे आता आपले शत्रू असून ते आपल्याविरुद्ध एकत्र येऊन कट-कारस्थान करताहेत, ही त्याची धारणा झाली. इजा झाला, बिजा झाला, इथून पुढे माघार नाही, ही खूणगाठ जर्मनीने मनाशी बांधली.......