अण्णा भाऊ साठे : जगण्यासाठी लढणाऱ्या माणसाची कथा!
अण्णा भाऊ साठ्यांच्या कथांचे एका वाक्यात वर्णन करावयाचे झाल्यास असे सांगता येईल की, त्या जगण्यासाठी लढणार्या माणसांच्या कथा आहेत. आपल्या कथांमध्ये निरनिराळी माणसे त्यांनी रंगवली आहेत. पण सर्वांच्या रक्तांतून एकच लढाऊ ईर्ष्या वाहत आहे. त्या सर्वांना मानाने जगायचे आहे. अंगांत असेल-नसेल तेवढे बळ एकवटून त्यांना आक्रमक वृत्तींशी सामना द्यायचा आहे आणि त्यांत त्यांना जिंकायचेही आहे.......