पोटगीची रक्कम निश्चित करण्यासाठी संबंधित पक्षकारांची संपूर्ण आर्थिक स्थिती जाणून घेण्याविषयीचा सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
भारतीय समाजात पतीपासून विभक्त व्हावे लागलेल्या आणि उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसलेल्या स्त्रियांना ‘पोटगी’ हा एक मोठाच आधार आणि दिलासा आहे. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने ‘रजनीश वि. नेहा’ या पोटगीच्या तक्रारीवरील निकालावर केलेल्या फौजदारी अपिलावर ४ नोव्हेंबर २०२० रोजी दिलेल्या निकालपत्रात याबाबत महत्वाचे निर्देश दिलेले आहेत.......