बंडखोरीकडून वेगानं आत्मशोधाकडे जाणारी कविता
आख्यानकाव्य, खंडकाव्य, लोककथागीत या तिन्ही पारंपरिक प्रकारांहून वेदिकाच्या कविता निराळ्या आहेत. त्यात सुबोध कथा सलग सांगितली जात नाही आणि ती दीर्घकविताही नाही. तिची वैशिष्ट्यं पाहिली तर ती कादंबरीच्या जवळ जाणारी दिसतात. ती अर्थातच महाकाव्याइतकी विशाल व व्यापक मुळीच नाही; पण अनेककेंद्री कथानक असलेली, सखोल विचार मांडणारी, एक अत्यंत गुंतागुंतीची रचना म्हणून ती कादंबरीच्या जवळ जाणारी आहे.......