गांधी शक्य आहेत, पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे, त्यांना शक्य करायला पाहिजे!
खरे सांगायचे तर गांधींइतका निर्भय माणूस गेल्या २०० वर्षांत जन्मला नाही. त्या गांधींना स्मरताना आपण भयभीत होत आहोत, खरे म्हणजे जर गांधी कुठल्या तरी रूपात आज आपल्या समोर आले असते, तर देव जाणे त्याने काय केले असते, आपली काय हालत केली असती. गांधी आपल्याला अस्थिर करतो, अनिश्चित करतो, विचलित करतो. म्हणून आपल्याला असत्य पचवायला सोपे वाटते आणि सत्य शोधायचा आपण प्रयत्न करत नाही.......