‘स्टोरीटेलर’ लिहून गजेंद्र अहिरेने स्वतःविरुद्ध भरभक्कम सज्जड पुरावा आपल्या हाती दिलाय- तुम्ही काय बोलताय माझ्याबद्दल, हे घ्या माझंच माझ्याविषयीचं निरीक्षण!
गजेंद्र नामी एडझवट दिग्दर्शक आहे, म्हणत ज्या काही खऱ्याखोट्या कथा रचल्या गेल्या, अजूनही रचल्या जात आहेत आणि रचल्या जातील, त्या तशाच आहेत, हे आपणच का सांगून टाकू नये, असं त्याला वाटलं की काय माहीत नाही. पण ‘स्टोरीटेलर’ची प्रेरणा तीच असावी, असा भक्कम संशय आहे. गजेंद्र ही एक साक्षात जितीजागती दंतकथा आहे. ते खरं तर एक गूढदेखील आहे. त्याचं हे पुस्तक वाचून त्या साऱ्या अनेकदा ऐकलेल्या किश्यांचा अनेकांना पुनःप्रत्यय येईल.......