मनमोकळेपणावर मनमोकळं
मोकळेपणानं बोलण्याची नुसती तीव्र इच्छा असून चालत नाही, तर आपला मोकळेपणा मानवणारा, सोसणारा आणि आवडणारा श्रोता भेटावा लागतो. मोकळेपणा स्वीकारण्याची, त्याचं स्वागत करण्याची क्षमता देशातल्या सामाजिक, राजकीय वातावरणात असावी लागते. आहे का तशी व्यवस्था आपल्या देशात? संसदेपासून ते कुटुंबापर्यंत संवाद होताना दिसत नाही... नुसतीच आदळआपट, आरोप-प्रत्यारोप आणि दोषारोप...संवाद नाहीच!.......