म. बसवेश्वरांकडे बुद्ध व महावीर यांच्यानंतर विषमतेविरुद्ध बंड करणारे वैचारिक व कृतिशील समाजसुधारक म्हणून पाहिले जाते!
आपल्याकडे वेगवेगळ्या कारणांनी अनेक क्रांत्या झाल्या, परंतु बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर यांच्या नेतृत्वात झालेल्या सामाजिक व धार्मिक क्रांतीचे एक वेगळेच महत्त्व आहे. क्रांती म्हणजे प्रचलित व्यवस्थेविरुद्ध केलेले बंड होय. क्रांतीचे मूळ हे सामाजिक राजकीय किंवा आर्थिक असू शकते. महात्मा बसवेश्वरांनी समाजातील गरीब, उपेक्षित, अस्पृश्य लोकांच्या कल्याणासाठी क्रांती केली होती.......