मराठा जातीला मागास म्हणून आरक्षण मिळणे अजिबातच शक्य नाही, हे सर्वश्रुतच आहे; आणि ते आंदोलनकर्त्यांनाही माहीत आहे, पण…
‘कसेही करून ते मिळावेच’ आणि ‘आम्ही मराठ्यांना आरक्षण दिल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही’, या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या घोषणांमध्ये नेहमीप्रमाणे दम नाही. फक्त जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे परिस्थिती चिघळू नये आणि आपली खुर्ची टिकावी, यासाठीच हा सर्व खटाटोप आहे. सरकारमध्ये सहभागी असलेल्या तीनही पक्षांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी आणि मुख्य म्हणजे या समाजाला उगीचच मधाचे बोट दाखवत झुलवत ठेवू नये!.......